प्रभावी प्रशासनात नागरिकांशी सुसंवाद महत्वाचा - जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, 19 डिसेंबर (हिं.स.)। शासकीय कार्यालयात नागरिकांचेविविध कामानिमित्त भेटी होत असतात. प्रभावी प्रशासनासाठी या भेटीदरम्यान नागरिकांचे म्हणणे, तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी
ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 19 डिसेंबर (हिं.स.)। शासकीय कार्यालयात नागरिकांचेविविध कामानिमित्त भेटी होत असतात. प्रभावी प्रशासनासाठी या भेटीदरम्यान नागरिकांचे म्हणणे, तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड, तहसीलदार नवनाथ वागवाड, विनायकराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.थोरे, प्रशिक्षणातील मार्गदर्शक संजय कुंडेटकर व वैजापूर तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती.

शासकीय कामकाजा बरोबरच विविध सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे ही आवश्यक आहे. याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असते. तसेच वाचन, लेखन याचा छंद जोपासला जावा.दैनंदिन सवयी मधूनच सकारात्मक बदल घडत असतो. तो आपल्या स्वतः सह कुटुंब, देश आणि समाजासाठी उपयुक्त ठरतो. प्रशासनात काम करत असताना आपल्या कामाचा आनंद बरोबरच समाजातील लोकांना आनंद मिळाला पाहजे.स्वतःच्या कामाचा अभिमान वाटावा असे एक तरी काम करावे. आपले पद समाजसेवा साठी वापरावे.प्रत्येक घटकातील संवाद हरवत गेला असून.तो प्रवाही पाहिजे, तसेच यात शब्दाचा वापर योग्य करावा. यातून जनतेची तक्रार अडचण किंवा आवश्यक असलेल्या योजनांच्या माहिती, विषयाची पूर्तता करण्यासाठी काम करावे. लोकाभिमुख प्रशासन करण्यात नागरिकांशी सुसंवाद साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांना प्रशिक्षण कार्यक्रमात केले.

संजय कुंडेटकर, यांनी पोलिस पाटील यांची भूमिका, कुटुंब, सेवा, पदाची वर्गवारी विविध पदाची कर्तव्य या विषयी महाराष्ट्र नागरी सेवा, वर्तवणूक, शिस्त, मत्ता व दायित्व याचे लिफाफा बंद विवरण सादर करण्यात यावे. याबांत नियमाचे मार्गदर्शन केले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande