बीड - बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती देण्याची मागणी
बीड, 19 डिसेंबर, (हिं.स.)। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती देण्याची मागणी विजय मंडळात केल्याबद्दल आमदार विजयसिंह पंडित यांचा सत्कार करण्यात आला. बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती मिळाव्यात या मागणी साठी सक
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती देण्याची मागणी केली


बीड, 19 डिसेंबर, (हिं.स.)। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती देण्याची मागणी विजय मंडळात केल्याबद्दल आमदार विजयसिंह पंडित यांचा

सत्कार करण्यात आला.

बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती मिळाव्यात या मागणी साठी सकल बंजारा समाज बांधवांनी राज्यभर आंदोलन केले, समाज बांधवांच्या मागण्या राज्याच्या सर्वोच्च पंचायती मध्ये मांडल्या, सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सवलती देण्याची मागणी केली.

गेवराई तालुक्यातील बंजारा समाज बांधवांनी सत्कार केला, खऱ्या अर्थाने या सत्कारामुळे जबाबदारी वाढली असून यावेळी विनम्रपणे सत्कार स्विकारून भविष्यात सुद्धा या प्रकरणात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन या निमित्ताने समाज बांधवांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande