
अमरावती, 19 डिसेंबर (हिं.स.)।
मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकनंतर आता विदर्भातील आणखी चार महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिगणात उतरणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना- मनसेची युती एकूण आठ जिल्ह्यांतील महापालिकांमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकरयांनी महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती येथील शिवसेना भवन राजापेठ येथे सदिच्छा भेट दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे व राजू उंबरकर यांच्यात अमरावती महानगर पालिका निवडणुकी करिता झाली प्राथमिक चर्चा. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत. शिवसेना पदाधिकारी व मनसे पदाधिकारी यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. यावेळी मनसे शहर प्रमुख धीरज तायडे, शिवसेना अमरावती शहर प्रमुख प्रवीणहरमकर, बडनेरा शहर प्रमुख संजय शेटे, मनसेचे नेते राजू उंबरकर, धीरज तायडे, विकी थेटे, पंकज तायडे, मनसे महिला सेना जिल्हाध्यक्ष शरयूताई पाजणकर, प्रवीण डांगे, रावेर गिरी, बबलू आठवले यांच्यासह असंख्य मनसैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी