
नांदेड, 19 डिसेंबर, (हिं.स.)। दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबाच्या देवस्वारी व पालखीचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.ना.बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर, लोहा विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पूजन करुन सुरुवात करण्यात आली.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माळेगाव येथे केले. ते माळेगाव येथे खंडोबा यात्रेनिमित्त नांदेड जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनापाप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माजी जि. प.सभापती प्रविण पाटील चिखलीकर, माजी जि.प. सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर, शरद पवार, सुनिल नानवटे, पशुसवर्धन अधिकारी प्रविणकुमार घुले, रोहित पाटील, चद्रमुनी मस्के, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे सह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की, माळेगाव यात्रेला विशेष महत्व असून, या यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. आपला देश कृषी प्रधान असून, शेतीमुळे अर्थ व्यवस्था बळकट होती. शेतीत ए आय तंत्रज्ञानाचा वापर करावा. शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय कडे वळावे असे आवाहनही सहकार मंत्री पाटील यांनी केले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis