कोल्हापूर: प्रकाश आंबेडकर यांचा प्रेस क्लब तर्फे निषेध
कोल्हापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। प्रसार माध्यमांचे मालक आणि पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीनं केला निषेध कोल्हापुरातील वंचित बहुजन आघाडीच्या
प्रेस क्लबच्यावतीनं दसरा चौकात निषेध आंदोलन


कोल्हापूर, 19 डिसेंबर (हिं.स.)।

प्रसार माध्यमांचे मालक आणि पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीनं केला निषेध

कोल्हापुरातील वंचित बहुजन आघाडीच्या विजयी संकल्प सभेवेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांचे मालक आणि पत्रकारांच्याबद्दल आक्षेपार्ह केले. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व पत्रकारांनी प्रकाश आंबेडकर यांचा जाहीर निषेध केला. याप्रकरणी कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीनं दसरा चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची विजयी संकल्प सभा, बुधवारी सायंकाळी कोल्हापुरातील दसरा चौक इथ पार पडली.या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केलं.यादरम्यान त्यांनी हातवारे करत, कोल्हापुरातील प्रसार माध्यमांचे मालक आणि उपस्थित पत्रकार , छायाचित्रकार,कॅमेरामन,यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.याचा निषेध आज कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीनं सर्व पत्रकारांनी केला.दसरा चौक इथल्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ यावेळी निषेध आंदोलन करण्यात आलं.प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरातील पत्रकारांची माफी मागावी, अशी मागणी करत , प्रकाश आंबेडकर यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी केली.

यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, जेष्ठ पत्रकार निवास चौगले, दिपक घाटगे, भूषण पाटील ,दयानंद जिरगे , शेखर पाटील , महेश कांबळे, राहुल गडकर,युवराज राऊत, सचिन सावंत, दूर्वा दळवी , श्रद्धा जोगळेकर ,प्रियंका निगवे,संदीप खांडेकर , अभिजीत पाटील, लुमाकांत नलवडे,सतेज औंधकर ,रणजित माजगावकर, सुनील पाटील, विश्वास कोरे, ओंकार धर्माधिकारी , सचिन सावंत, निलेश शेवाळे, सुनील काटकर, विकास पाटील, संभाजी गंडमाळे, धीरज बरगे , बाळासाहेब उबाळे, विशाल पुजारी, सुरेश आंबुसकर, यांच्यासह कोल्हापूर प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande