मानवत येथे पवार गटाच्या उमेदवार राणी अंकुश लाड विजयी
परभणी, २१ डिसेंबर (हिं.स.)। मानवत नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार सौ. राणी अंकुश लाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार अंजली महेश कोक्कर यांचा 5 हजार 391 एवढ्या मोठ्या मता
अ


परभणी, २१ डिसेंबर (हिं.स.)। मानवत नगरपालिकेंतर्गत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार सौ. राणी अंकुश लाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार अंजली महेश कोक्कर यांचा 5 हजार 391 एवढ्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला. येथील प्रभागनिहाय लढतीत सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमाने आमदार राजेश विटेकर व माजी नगराध्यक्ष अंकुश लाड यांचे बहुतांशी समर्थक सदस्य निवडून आले आहेत.

मानवत येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज रविवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नगराध्यक्षांसह सदस्य पदाकरीता निवडणूकीतील मतमोजणीस प्रारंभ झाला. नगराध्यक्षपदासाठी दुरंगी लढतीत सौ. लाड यांना 14 हजार 587 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सौ. कोक्कर यांना 9 हजार 196 एवढी मते मिळाली. त्यात सौ. लाड 5 हजार 391 मतांनी विजयी झाल्या. दरम्यान, या पालिकेंतर्गत सदस्य पदाच्या निवडणूकीतसुध्दा राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वतःचे वर्चस्व कायम राखले. या निवडणूकीत 11 प्रभागात 22 जागांकरीता प्रतिष्ठेच्या लढती झाल्या. परंतु, विटेकर व लाड गटाने 22 पैकी 16 जागा पटकावल्या. विरोधकांना म्हणजे शिवसेना शिंदे गटास 4, भारतीय जनता पार्टीस 1, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटास 1 जागा मिळाली.

----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande