मुर्तिजापूरमध्ये भाजपचा गडही आला आणि सिंहही
अकोला, 21 डिसेंबर (हिं.स.)। अकोल्याच्या मूर्तिजापुरात भाजपने आपला गड कायम ठेवला आहे. भाजपचे हर्षल साबळे हे 718 मतांनी निवडून आले आहेत. मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजप आमदार हरीश पिंपळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मूर्तिजापुरात भाजपने नग
P


अकोला, 21 डिसेंबर (हिं.स.)।

अकोल्याच्या मूर्तिजापुरात भाजपने आपला गड कायम ठेवला आहे. भाजपचे हर्षल साबळे हे 718 मतांनी निवडून आले आहेत. मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजप आमदार हरीश पिंपळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मूर्तिजापुरात भाजपने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणत हरीश पिंपळे यांचे भाऊ भुपेंद्र पिंपळे यांच्या भावाचाही विजय झाल्याने, भाजपने गडही आणला आणि सिंहही... अशी चर्चा रंगली आहे. मूर्तिजापुरात ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. 11 व्या फेरी पर्यंत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेख इम्रान शेख खलील हे आघाडीवर होते. मात्र बारावी फेरी निर्णायक ठरली आहे. बाराव्या फेरीत भाजपचे हर्षल साबळे यांनी आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande