अकोटमध्ये राष्ट्रवादीला धक्का, भाजपाने गड राखला
अकोला, 21 डिसेंबर (हिं.स.)। अकोल्यातील अकोट नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे अकोट नगरपरिषद निवडणुकीत जवळपास सर
P


अकोला, 21 डिसेंबर (हिं.स.)।

अकोल्यातील अकोट नगरपरिषदेवर पुन्हा एकदा भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करत नगराध्यक्षपदावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे अकोट नगरपरिषद निवडणुकीत जवळपास सर्वच महिला उमेदवारांना राजकीय वारसा लाभलेला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी भाजपचे मित्र पक्ष एकनाथ शिंदे गटाच्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अ.प )

उमेदवार सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभ्या होत्या.या निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. अकोटमध्ये ही निवडणूक आमदार अमोल मिटकरी यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. त्यांचे खंदे समर्थक तथा जिल्हाध्यक्ष बद्रुजमा यांच्या पत्नीचा दारुण पराभव झाला आहे.

या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः सभा घेतली होती, मात्र त्यांच्या गटाला केवळ दोन नगरसेवकांपुरतेच समाधान मानावे लागले. दुसरीकडे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र तिन्ही प्रमुख ठिकाणी भाजपने बाजी मारल्याने शिवसेना शिंदे गटासह महायुतीतील इतर पक्षांना मोठा धक्का बसला आहे.अकोटच्या जनतेने भाजपच्या विकासाच्या कामांवर विश्वास टाकला आहे.तर भाजपने हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला समर्पित केला आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande