बार्शीटाकळी नगरपंचायतवर वंचित चा झेंडा
अकोला, 21 डिसेंबर, (हिं.स.)। बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकतर्फी विजयाचा झेंडा फडकवला आहे. वंचितच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अफसर खातून अलीमुद्दीन यांनी तब्बल ९,१९३ मतांनी विजय मिळवला असून, भारतीय जनता पक्षाच्या कोकिळा
P


अकोला, 21 डिसेंबर, (हिं.स.)।

बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकतर्फी विजयाचा झेंडा फडकवला आहे. वंचितच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अफसर खातून अलीमुद्दीन यांनी तब्बल ९,१९३ मतांनी विजय मिळवला असून, भारतीय जनता पक्षाच्या कोकिळा येळवणकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

या विजयाने बार्शीटाकळी नगरपंचायतीत नवा राजकीय बदल घडवून आणला आहे. यापूर्वी या नगरपंचायतीवर काँग्रेसचा प्रभाव राहिला होता, मात्र यंदा वंचित बहुजन आघाडीने मोठी बाजी मारत एकतर्फी विजय मिळवला आहे. वंचितच्या उमेदवाराला आठ हजाराहून अधिक मतांची आघाडी मिळाल्याने या निकालामुळे बार्शीटाकळीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत.

या विजयाने वंचित बहुजन आघाडीने स्थानिक पातळीवर आपले संघटनात्मक बळ सिद्ध केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande