
अकोला, 21 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला जिल्ह्यातील पाच नगर परिषदा व एका नगर पंचायतीच्या सहा नगराध्यक्षांचे आणि 142 सदस्यांचे निकाल आज जाहीर झाले.. या निकालात भाजपने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळाले.. जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, हिवरखेड आणि मूर्तिजापूर मध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे.. तर बार्शीटाकळीचा गड वंचितने काबीज केला तर बाळापूर मध्ये काँग्रेसने वंचित आघाडीला धक्का देत पुन्हा एकदा बाळापूर मध्ये सत्ता काबीज केली.. अकोला जिल्ह्यातील पाच नगरपरिषद आणि एक नगरपंचायत अशा सहा नगराध्यक्ष पदासाठी एकूण 38 उमेदवार, तर सदस्यांच्या 142 जागांसाठी रिंगणात असलेल्या 680 अशा एकूण 718 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला अखेर आज जाहीर झाला.. महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना धक्का बसला तर भाजपने महायुतीतील पक्षांनाही जोरदार धक्का दिला.. त्यामुळे भाजपच जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला.. सर्वाधिक रंजक लढत ही मूर्तिजापूर मध्ये पाहायला मिळाली.. अगदी शेवटपर्यंत लढतीत आघाडीवर असलेल्या वंचितच्या उमेदवाराला मात देत शेवटच्या फेरीत भाजपने आघाडी घेत भाजपचे हर्षल साबळे याठिकाणी विजयी झाले.. तर हिवरखेड मध्ये भाजपच्या सुलभा दुतोंडे यांनी शिवसेना शिंदे गटाचा पराभव करत शोभा घुंगड या शिवसेना उमेदवाराला चित केले.. तर अकोट मध्ये एमआयएम ने भाजपला चांगलीच टक्कर दिली मात्र भाजपच्या माया धुळे यांचा विजय झाला.. तेल्हारा मध्ये भाजपच्या वैशाली पालीवाल या विजयी झाल्या तर बार्शिटाकळी वंचितच्या अख्तर खातून यांनी काँग्रेसला मात दिली तर बाळापूर वंचित बहुजन आघाडीला मात काँग्रेस ने हा गड काबीज केला. येथील माजी आमदार खतीब घराण्याची 50 वर्षाची विजयाची परंपरा खंडित केली.. तर आमदार नितीन देशमुख यांनी महाविकास आघाडीचा गड राखला..
नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार!
* बाळापूर: अफरीन परवीन (काँग्रेस)
* अकोट : माया धुळे (भाजप)
* हिवरखेड : सुलभा दुतोंडे (भाजप)
* तेल्हारा : वैशाली पालीवाल (भाजप)
* मुर्तिजापूर: हर्षल साबळे (भाजप)
* बार्शिटाकळी: अख्तर खातून (वंचित बहुजन आघाडी)
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे