अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष निवडणूक वादात; काँग्रेसचा न्यायालयात जाण्याचा निर्णय
अमरावती, 21 डिसेंबर, (हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्
अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष निवडणूक वादात; फेरमतमोजणी नाकारल्याने काँग्रेसचा न्यायालयात जाण्याचा निर्णय


अमरावती, 21 डिसेंबर, (हिं.स.)

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. नगराध्यक्ष पदाच्या मतमोजणीत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणीची मागणी फेटाळून लावली.

या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयात याचिका दाखल करून फेर मतमोजणीसह निवडणूक प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande