
गडचिरोली., 21 डिसेंबर (हिं.स.)
गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पार्टीने (भाजप) तिन्ही नगरपालिकेत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तिन्ही ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपदासह बहुमताचा आकडा गाठत सत्तेची 'हॅट्ट्रिक' साधली आहे.
गडचिरोली नगर परिषद: प्रणोती निंबोरकर यांची बाजी
जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी भाजपने आपला गड राखला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रणोती निंबोरकर यांनी विजय मिळवला आहे.गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्र.४ ब मध्ये काँग्रेस चे उमेदवार श्रीकांत देशमुख यांनी १मतांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी संजय मांडवगडे यांचा पराभव केला तर प्रभाग क्र.५ब मध्ये शिवसेनेचे नितेश खडसे यांचा काँग्रेसचे उमेदवार सतीश विधाते यांच्याकडून ५ मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला.
पक्षीय बलाबल (एकूण २७ जागा):
-
भाजप: १५
-
काँग्रेस: ०६
-
राष्ट्रवादी: ०५
-
अपक्ष: ०१
-
आरमोरी नगरपरिषद: रुपेश पुणेकर यांचा विजय
-
आरमोरी येथेही भाजपने विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. भाजपचे रुपेश पुणेकर नगराध्यक्षपदी निवडून आले असून, नगरसेवकांच्या जागांमध्येही भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.पक्षीय बलाबल (एकूण २० जागा):
-
भाजप: १५
-
काँग्रेस: ०४
-
शिवसेना (शिंदे गट): ०१
-
देसाईगंज नगरपालिका: लता सुंदरकर यांची सरशी
-
देसाईगंजमध्ये चुरशीच्या लढतीत भाजपच्या लता सुंदरकर यांनी नगराध्यक्षपदावर नाव कोरले आहे. या विजयामुळे देसाईगंज नगरपालिकेत भाजपची सत्ता कायम राहिली आहे.पक्षीय बलाबल (एकूण २१ जागा):
-
भाजप: १२
-
काँग्रेस: ०६
-
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०३
या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. गडचिरोली जिल्ह्यात भाजपने केलेली ही कामगिरी आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे मनोबल वाढवणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे तिन्ही नगरपालिकेत भाजपने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला आहे.
या तिन्ही नगरपरिषदांमधील विजयामुळे गडचिरोली जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विकासाच्या दृष्टीने भाजप निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत विजयाचा आनंद व्यक्त केला. जिल्ह्यातील नागरिकांनी दिलेल्या विश्वासाबद्दल विजयी उमेदवारांनी जनतेचे आभार मानले असून, पारदर्शक प्रशासन व सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond