बच्चू कडूंच्या प्रहारचा चांदूरबाजारमध्ये झेंडा; भाजपला हादरा
अमरावती, 21 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात माजी राज्यमंत्री बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाला फारशी चांगली कामगिरी करता आली. बच्चू कडूंच्या प्रहारचा चांदूरबाजारमध्ये झेंडा; भाजपला दिला हादरा. चांदूर बाजार नगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता ह
बच्चू कडूंच्या प्रहारचा चांदूरबाजारमध्ये झेंडा; भाजपला दिला हादरा..


अमरावती, 21 डिसेंबर (हिं.स.)।

अमरावती जिल्ह्यात माजी राज्यमंत्री बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाला फारशी चांगली कामगिरी करता आली. बच्चू कडूंच्या प्रहारचा चांदूरबाजारमध्ये झेंडा; भाजपला दिला हादरा. चांदूर बाजार नगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता हस्तगत केली आहे.

चांदूरबाजारमध्ये नगराध्यक्षपदी प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार मनीषा नांगलिया या निवडून आल्या असून त्यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार कांताबाई अहीर यांचा ८१५ मतांनी पराभव केला. मनीषा नांगलिया यांना ५ हजार ८१ मते तर कांताबाई अहीर यांना ४ हजार २६६ मते प्राप्त झाली.

सदस्यपदांपैकी १२ जागा प्रहारने जिंकल्या असून भाजपला ३, काँग्रेसला १, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १ तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत.

मनीषा नांगलिया यांनी यावेळी भाजपकडे उमेदवारी मागितली होती, पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने नांगलिया यांनी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे यावेळी निवडणूक लढवली. त्यात त्यांना यश मिळाले. मनीषा नांगलिया यांनी यापूर्वी चांदूर बाजारचे नगराध्यक्षपद भुषवले आहे. त्यांचे पती मनीष नांगलिया हे देखील चारवेळा अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

बच्चू कडूंची खेळी यशस्वी

२०२० मध्ये चांदूर बाजारचे नगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली होती. त्यावेळी भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असूनही भाजपला सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश आले होते. भाजपतर्फे गोपाल तिरमारे यांनी निवडणूक लढवली होती, तर प्रहारतर्फे नितीन कोरडे हे मैदानात होते. नितीन कोरडे यांची ९ नगरसेवकांच्या समर्थनाने निवड झाली होती, तर गोपाल तिरमारे यांना ८ मते मिळाली होती. गोपाल तिरमारे हे बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक मानले जातात. २०१५ पुर्वी तिरमारे हे बच्चू कडू यांचे सहकारी म्हणून काम करीत होते, पण नंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande