
चंद्रपूर, 21 डिसेंबर (हिं.स.)।
चंद्रपूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका व एका नगरपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा बोलबाला राहिला आहे. मात्र भाजपला मोठा धक्का बसला आहे.
आपले गड राखण्यात भाजपला अपयश आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत बघता नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस ७, शिंदे सेना १, भाजप २ तर अपक्ष १ उमेदवार विजयी झाले आहेत.
जिल्ह्यातील नगरपालिका- नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार-
-भद्रावती नगराध्यक्ष : शिंदे सेनेचे प्रफुल्ल चटकी
-वरोरा नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अर्चना ठाकरे
-मूल नगराध्यक्ष : काँग्रेसच्या एकता समर्थ
-राजुरा नगराध्यक्ष - काँग्रेसचे अरुण धोटे
-गडचांदूर नगराध्यक्ष -अपक्ष निलेश ताजने
-नागभीड नगराध्यक्ष : काँग्रेसच्या स्मिता खापर्डे
-ब्रम्हपुरी नगराध्यक्ष : काँग्रेसचे योगेश मिसार
-चिमूर नगराध्यक्ष : भाजपच्या गीता लिंगायत
-घुग्गुस नगराध्यक्ष : काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के
-बल्लारपूर नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अलका वाढई
-नगर पंचायत-भिसी नगराध्यक्ष : भाजपचे अतुल पारवे
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव