
येवला, 21 डिसेंबर (हिं.स.)।
: येवला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधील निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून शहरातील मोमीनपुरा भागात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आला. या घटनेत शिवसेना (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अशीच घटना 11 नंबर वार्ड मध्येही घडले आहे. त्याचाही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात कोणाला जखम नाही झाली परंतु घरातील वस्तूंची नासधूस केली आहे शहर पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली आहे. त्याचाही गुन्हा नोंदवायची प्रक्रिया सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी व मनमाड डी वाय एस पी महाजन, पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी संबंधितांकडन तक्रार दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी व मनमाड डी वाय एस पी महाजन, पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी संबंधितांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV