गंगाखेड नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उर्मिला मधुसूदन केंद्रे विजयी
परभणी, 21 डिसेंबर (हिं.स.)। गंगाखेड येथील नगर पालिकेंतर्गत नगरध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे यांच्या सौभाग्यवती सौ. उर्मिला मधुसूदन केंद्रे यांनी त्यांच्या विरोधक तथा विद्यमान आमदार डॉ
गंगाखेड नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सौ. उर्मिला मधुसूदन केंद्रे विजयी


परभणी, 21 डिसेंबर (हिं.स.)।

गंगाखेड येथील नगर पालिकेंतर्गत नगरध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे यांच्या सौभाग्यवती सौ. उर्मिला मधुसूदन केंद्रे यांनी त्यांच्या विरोधक तथा विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडी यशवंत सेनेच्या सौ. निर्मलादेवी गोपालदास तापडिया यांचा 678 मतांनी पराभव केला.

येथील नगराध्यक्ष पदाच्या निवडणूका चौरंगी झाल्या. या निवडणूकीत माजी आमदार डॉ. केंद्रे व विद्यमान आमदार डॉ. गुट्टे यांची राजकीय प्रतिष्ठा पणास होती. या प्रतिष्ठेच्या व अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार या विषयी उत्कंठता निर्माण झाली होती. अखेर अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत सौ. उर्मिला केंद्रे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी सौ. निर्मला तापडिया यांचा 678 मतांनी पराभव केला. सौ. केंद्रे यांना 10054 तर सौ. तापडिया यांना 9376 मते मिळाली. या निवडणूकीत काँग्रेसच्या उजमा माईन समीर शेख युनुस नेते यांनी 6 हजार 242 मते मिळविली. तर भारतीय जनता पार्टीच्या सौ. जयश्री रामप्रभु मुंडे यांना 6221 मते मिळाली. अपक्षा श्रीमती कमलाबाई गिर यांना 259 मते मिळाली. या व्यतिरिक्त नोटा 205 मते मिळाली.

सदस्य पदाच्या निवडणूकीत एकूण 13 प्रभागात 26 जागांपैकी डॉ. गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडी यशवंत सेनेने 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 7 तर शिवसेना उबाठा गटाने 3 व भारतीय जनता पार्टीने केवळ 1 जागी यश मिळविले आहे. या सदस्य पदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टी व काँग्रेसचा मोठा धुव्वा उडाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande