
पुणे, 21 डिसेंबर (हिं.स.)।
खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर गतवर्षीपासून पं. दिवंगत वसंतराव गाडगीळ व मल्हारभक्त दिवंगत बबनराव खेडेकर यांच्या प्रेरणेतून मनीषा राजेंद्र खेडेकर यांच्या संकल्पनेतून महिलांकडून ‘श्री हरिद्रामार्चन पूजा व महाआरती’ हा अभिनव उपक्रम श्री मल्हारी मार्तंडाच्या षटरात्र काळात सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.
‘हरिद्रा’ म्हणजे खंडोबाला प्रिय हळद आणि ’अर्चन’ म्हणजे अभिषेक. हळदीरूपी अभिषेक सामूहिकरीत्या खंडेरायाला अर्पण करून, खंडेरायाच्या 108 नामांचा जयघोष करत भव्य महाआरती करण्यास ’श्री हरिद्रामार्चन पूजा व महाआरती’ असे नामकरण करण्यात आले.गेल्या वर्षी या उपक्रमात 1 हजार महिला सहभागी झाल्या होत्या. यंदा मात्र तब्बल 5 हजार महिला लाल साडी परिधान करून उपस्थित राहिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु