देवरूख नगरपंचायतीवर महायुतीची सत्ता; मृणाल शेट्ये नगराध्यक्ष
रत्नागिरी, 21 डिसेंबर, (हिं. स.) : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये यांनी विजय मिळविला. नगरपंचायतीच्या १७ प्रभागांपैकी भाजपचे ३, शिवसेना श
देवरूख नगरपंचायतीवर महायुतीची सत्ता; मृणाल शेट्ये नगराध्यक्ष


रत्नागिरी, 21 डिसेंबर, (हिं. स.) : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या सौ. मृणाल शेट्ये यांनी विजय मिळविला.

नगरपंचायतीच्या १७ प्रभागांपैकी भाजपचे ३, शिवसेना शिंदे गटाचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ४, शिवसेना ठाकरे गटाचे ३, तर ४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. प्रत्येक प्रभागात एकच उमेदवार निवडून द्यायचा होता. सविस्तर निकाल असा -

प्रभाग १ – समृद्धी वेलवणकर (भाजप), प्रभाग २ – यशवंत गोपाळ (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट), प्रभाग ३ – दीपक गेल्ये (शिवसेना शिंदे गट), प्रभाग ४ – वैभव पवार (शिवसेना शिंदे गट), प्रभाग ५ – स्वाती राजवाडे (भाजप), प्रभाग ६ – प्राची भुवड (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट), प्रभाग ७ – श्रद्धा इंदुलकर (भाजप), प्रभाग ८ – सिद्धेश वेल्हाळ (अपक्ष), प्रभाग ९ – कविता नार्वेकर (अपक्ष), प्रभाग १० – अक्षय झेपले (अपक्ष), प्रभाग ११ – अनुराग कोचिरकर (अपक्ष), प्रभाग १२ – बाळा कामेरकर (शिवसेना ठाकरे गट), प्रभाग १३ – रितिका कदम (शिवसेना ठाकरे गट), प्रभाग १४ – नेहा आंबेकर (शिवसेना शिंदे गट), प्रभाग १५ – निधा कापडी (शिवसेना ठाकरे गट), प्रभाग १६ – दीपक खेडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट), प्रभाग १७ – रूपाली बेंद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट).

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande