
रायगड, 21 डिसेंबर (हिं.स.)।
माथेरान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला असून शिवसेना शिंदे गटाने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सात प्रभागांतील एकूण १४ नगरसेवक पदांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांनी बहुसंख्य जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापनेच्या दिशेने भक्कम वाटचाल केली आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे केतन रामने आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या अनुसया ढेबे विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादीचे सिताराम कुंभार तर शिंदे गटाच्या लता ढेबें यांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या रिजवाना शेख आणि शिवाजी शिंदे यांनी दोन्ही जागांवर विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये शिंदे गटाचे गौरंग वाघेला विजयी झाले, तर भाजपच्या सौ. प्रतिभा घावरे यांनी यश संपादन केले. प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सचिन दाभेकर आणि शिंदे गटाचे कमल गायकवाड विजयी झाले. प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिंदे गटाचे सोहेल महापुळे व सौ. सुरेखा साळुंखे यांनी स्पष्ट विजय नोंदवला. प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिंदे गटाचे संतोष शेलार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनिता रांजाणे विजयी ठरल्या.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी हे ६२९ मतांनी आघाडीवर असल्याने नगराध्यक्षपदावर शिंदे गटाचा झेंडा फडकावण्याचे संकेत मिळाले आहेत. या निकालामुळे माथेरान नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाची सत्ता निश्चित मानली जात असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके