

नाशिक, 21 डिसेंबर (हिं.स.)।
- नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक धक्कादायक निकाल लागलेले आहेत पण भाजपाला यश मिळाले असले तरी त्याबरोबर इगतपुरी मध्ये 30 वर्षाची सत्ता उलटवून लावण्यात आली आहे. तर येवल्यामध्ये माजी खासदार समीर भुजबळ हे परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तीन तर भारतीय जनता पक्षाला तीन नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पद मिळालेले आहे एकूणच महायुतीचा बोलबाला राहिला असला तरी देखील नाशिक मध्ये मात्र भाजपाला शिवसेना शिंदे गटाने मात्र रोखले आहे.
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी दि.२ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी एकूण ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ६५.९४ टक्के मतदान झाले होते. यामध्ये त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत सर्वाधिक म्हणजे जवळपास ८५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज रविवारी (दि.२१) रोजी मतमोजणी पार पडली असून, जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षपदासह विजयी झाले आहेत.
येवल्यामध्ये राकपाच्या विजयाने समीर भुजबळांची परीक्षा पास
येवला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या ठिकाणी एकत्रित निवडणूक लढवत होती तर या ठिकाणी शिंदेंची शिवसेना ही सत्तेमध्ये असताना देखील आपल्याच मित्र पक्षांबरोबर विरोधात लढली त्यामुळे या ठिकाणी सत्तेतीलच पक्षांमध्ये लढाई झाली नक्कीच कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष होते या ठिकाणी निवडणुकीला प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांची प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईमध्ये रुग्णालयात दाखल झालेले होते. त्यांच्या गैरहजेरीमध्ये या भागाची सर्व जबाबदारी ही माजी खासदार आणि भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी घेतली अक्षरशः या परिसरामध्ये समीर भुजबळ तसेच आमदार पंकज भुजबळ, शेफाली भुजबळ यांनी येवल्या मध्ये ठाण मांडून जोरदार लढाई केली. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाला पाहिजे तसे यश संपादन करता आले नाही या ठिकाणी शिंदे पक्षाचे आमदार दराडे यांचे मुलगा रुपेश दराडे हा निवडणुकीला उभा होता तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ पैलवान राजेंद्र लोणारी यांना उमेदवारी देण्यात आलेली होती त्यामुळे या ठिकाणची लढत रंगतदार होणार हे सुरुवातीपासूनच व्यक्त केलं जात होतं सत्तेमध्ये असलेला पक्ष कोणता जिंकतो हे बघणं महत्त्वाचं असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि पैलवान राजेंद्र लोणारी हे विजयी झालेले आहेत. यामुळे समीर भुजबळ या परीक्षेमध्ये पास झाले आहेत समीर भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की , नागरिकांनी दिलेला आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट यामुळे आमचा विजय झाला पण या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेले कार्य विकासाची वाहिलेली धुरा ही पुन्हा एकदा अधोरेखित करताना राष्ट्रवादी वरती दाखवलेला विश्वास सार्थ करू असे जमले
इगतपुरीला तीस वर्षांच्या सत्तेचा सुपडा साफ ; शिवसेना शिंदे गटाच्या शालिनी खातळे नगराध्यक्षपदी विजयी
- इगतपुरी नगरपरिषदेमध्ये तीस वर्षाच्या सत्तेला झूगारून देत परिवर्तन झाले आहे. नगराध्यक्षपदी शालिनी संजय खातळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या मधूमालती मेंद्रे यांचा पराभव केला. तिसऱ्या स्थानी वंचितच्या अपर्णा चंद्रशेखर धात्रक तर चौथ्या क्रमांकावर राष्ट्रीय काँग्रेसच्या शुभांगी यशवंत दळवी ह्या फेकल्या गेल्या. राष्ट्रवादी अप १३, शिवसेना शिंदे ५, भाजपा २, तर शिवसेना उबाठाला १ जागा तर भाजपाने २ जागा मिळवल्या आहेत. इंदिरा काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. तीस वर्षांपासून इगतपुरीवर सत्ता गाजवणारे संजय इंदुलकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अपचे मंगेश शिरोळे यांनी दारुण पराभवाची धूळ चाखायला लावली. संजय इंदुलकर यांनी ३० वर्षांपासून टक्कर देणारे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण यांचा दणदणीत विजय झाला असून मंगेश शिरोळे, भारती शिरोळे हे पतीपत्नी विजयी झाले. विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोष केला.
सिन्नरमध्ये विजयासाठी भाजपला झुंजावे लागले
सिन्नर नगरपालिका निवडणुकीमध्ये पहिल्यापासूनच भाजपा विरुद्ध इतर पक्ष असा संघर्ष सुरू होता या संघर्षाला निवडणूक जशी जवळील तसे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र निर्माण झाले त्यामध्ये महा युतीकडून विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांचे भाऊ हेमंत वाजे हे भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आलेले होते तर त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विलास उगले यांना उमेदवारी देण्यात आलेली होती मतमोजणीच्या वेळेस सुरुवातीपासूनच विलास उगले हे बाराशे मताच्या मताधिक्याने पुढे चाललेले होते पण पुढील फेरीमध्ये शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला विजय मिळाला या ठिकाणी कोकाटे यांचे समर्थक असलेले उगले यांचा विजय झाला.
चांदवड मध्ये काँग्रेसचा टिकाव नाही
चांदवड या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक होत असताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपचा पदर पकडला त्यामुळे या ठिकाणची निवडणूक कशी होते हे सगळ्यांच्याच लक्ष वेधून होतं पण या ठिकाणी काँग्रेसचा टिकाऊ लागला नाही त्यामुळे या ठिकाणी चांदवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे वैभव बागुल विजयी झाले आहेत. या ठिकाणी भाजपाला कोतवालांचा प्रवेश करून घेणं हे फायदेशीर ठरलेले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत याचा किती फायदा होतो यावर आता पुढचे गणित अवलंबून आहे.
पिंपळगावला महायुतीचा पहिला नगराध्यक्ष
पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत चे रूपांतर हे नगरपालिकेमध्ये झाले त्यानंतर ही पहिलीच निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार दिलीप बनकर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले भाऊ भास्कर बनकर यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन मोठ्या प्रमाणावर ती राजकारण करत निवडणुकीमध्ये धमाल उडून दिली होती पण या ठिकाणी शेवटी महायुतीला यश मिळाले या ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपचे मनोज बर्डे हे भाजपा शिंदे सेनेचे 18 उमेदवार निवडून आणत विजयी झालेले आहे त्यामुळे पिंपळगाव बसवंत येथे एक हाताने महायुतीची सत्ता पहिल्याच वेळेस आली आहे.
नांदगाव - मनमाड मध्ये शिंदे सेनेचे एक हाती वर्चस्व
नांदगाव तालुक्यामध्ये असलेल्या नांदगाव व मनमाड या दोन्हीही नगरपालिकेमध्ये अखेर शिवसेना शिंदे गटाला यश मिळाले आहे या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांनी केलेले प्रयत्न त्यांना मिळालेली नागरिकांची साथ आखलेली रणनीती त्यामुळे विरोधी पक्षाला चित करण्यात त्यांना यश मिळालं आहे. नांदगाव मध्ये पहिल्याच फेरीमध्ये नगराध्यक्षपदासह शिंदे सेनेचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आमदार सुहास कांदे यांचा करिष्मा दिसून आला आहे. याठिकाणी नगराध्यक्षपदी सागर हिरे विजयी झाले आहेत.
मनमाड नगरपालिकेमध्ये देखील शिंदे ची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यात लढाई झाली त्यामध्ये देखील शिवसेना शिंदे गटाचे बबलू पाटील यांनी विजय मिळवला या ठिकाणी समीर भुजबळ व आमदार सुहास कांदे यांच्यामधील लढाई होती पण शेवटी समीर भुजबळ यांना या ठिकाणी पराभव असं करावा लागणार आणि सुहास कांदे यांचा विजय झाला.
भाजपा बंडखोरामुळे पक्षाचा उमेदवार पडला
सटाणा नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या हर्षदा पाटील यांनी बाजी मारली आहे.भाजपच्या योगिता मोरे यांचा त्यांनी दणदणीत पराभव केला आहे. नगरसेवकपदाच्या २४ पैकी १५ जागा मिळाल्या तरी नगराध्यक्षपदाने भाजपला हुलकावणी दिली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या रूपाली कोठावदे यांनी या निवडणुकीत फडकावलेले बंडाचे निशाण भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या हर्षदा पाटील या मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथील माहेरवासीण आहेत.
त्र्यंबकेश्वर मध्ये परंपरागत भाजपचा पराभव
त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची सरळ लढत झाली परंपरागत त्र्यंबकेश्वर मध्ये भाजपाचा विजय आणि निश्चित मानला जातो पण यावेळेस मात्र भाजपला या ठिकाणी फटका सहन करावा लागला आहे सुरुवातीपासूनच भाजपा आपला विजय होणार हे गृहीत धरून चाललेलं होतं पण शिंदे सेनेची रणनीती आणि इतर सर्व हातखंडे च उपयोग केल्यामुळे भाजपाला परंपरागत आपला विजय कायम ठेवता आला नाही पहिल्या फेरीपासूनच भाजपाचे कैलास घुले आणि शिवसेना शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार यांच्यामध्ये लढत होती शेवटी भाजपाच्या शिंदे गटाने अखेर 492 मतांची आघाडी घेत भाजपाला दूर चारली आणि त्रिवेणी तुंगार या त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष झाल्या
भगूरला पंचवीस वर्षाचं शिवसेना साम्राज्य संपले
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भगूर या नगरपालिकेमध्ये मागील पंचवीस वर्षापासून एक हाती शिवसेनेची सत्ता होती या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी शिवसेना शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष एकत्र येऊन निवडणूक झाली पण या ठिकाणी यांना शिवसेनेचे साम्राज्य कायम ठेवता आले नाही त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्या करंजकर यांचा दारुण पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रेरणा बलकवडे यांनी दणदणीत विजय मिळवला त्यांच्या विजयामुळे मागील 25 वर्षाचे सेनेचे साम्राज्य संपुष्टात आले.
ओझर ला भाजपाचा विजय
ग्रामपंचायत नंतर प्रथमच नगरपंचायतीच्या रूपामध्ये स्थापन झालेल्या ओझर या नगरपंचायतीमध्ये भाजपा एकसंग राहिली आणि त्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला पण या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला आपले अस्तित्व टिकवता आले नाही पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपच्या अनिता हेगळ या विजयी झाल्या त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जयश्री जाधव यांचा दारुण पराभव केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV