शेतकऱ्यांचे नुकसान न करता नियमानुसार सोयाबीन खरेदी करा: मंत्री बाबासाहेब पाटील
लातूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांचे नुकसान न करता नियमानुसार सोयाबीन खरेदी करा: सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील ​अहमदपूर तालुक्यात ९ खरेदी केंद्रे सुरू; उमरगा यल्लादेवी येथे संगाई हमी खरेदी केंद्राचे उद्घाटन कष्टाने पिकवलेल्या मालाला योग्य
शेतकऱ्यांचे नुकसान न करता नियमानुसार सोयाबीन खरेदी करा: सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील


लातूर, 21 डिसेंबर (हिं.स.)।

शेतकऱ्यांचे नुकसान न करता नियमानुसार सोयाबीन खरेदी करा: सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील

​अहमदपूर तालुक्यात ९ खरेदी केंद्रे सुरू; उमरगा यल्लादेवी येथे संगाई हमी खरेदी केंद्राचे उद्घाटन

कष्टाने पिकवलेल्या मालाला योग्य न्याय मिळणे आवश्यक आहे. उमरगा यल्लादेवी येथील संगाई सिड टेक प्रो. कंपनीच्या खरेदी केंद्राने शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान न करता, शासनाच्या नियमाप्रमाणे हमीभावाने सोयाबीन खरेदी करावी, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्रीमंडळात बाबासाहेब पाटील यांनी केले.

​उमरगा यल्लादेवी (ता. अहमदपूर) येथे शासनमान्य हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन राजकुमार सोमवंशी होते.

​सहकार मंत्री पाटील पुढे म्हणाले की, उमरगा यल्लादेवी व परिसरातील शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी होणारी ससेहोलपट थांबावी, यासाठी या केंद्राला विशेष मान्यता मिळवून दिली आहे. अहमदपूर तालुक्यात सध्या अशी नऊ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्र संचालकांनी ऑनलाइन प्रणालीचा वापर करून पारदर्शक पद्धतीने खरेदी करावी आणि केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

​सोयाबीनच्या दराबाबत बोलताना ना. पाटील म्हणाले की, सोयाबीनचे दर हे केवळ स्थानिक पातळीवर नव्हे, तर जागतिक बाजारपेठेनुसार ठरवले जातात. यंदा पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकाची पूर्ण भरपाई करणे कठीण असले तरी, शासन आपले कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande