तीन अपत्यानंतरही सरपंचपद वैध उच्च न्यायालयाचा एैतिहासिक निकाल
सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहात असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने एैतिहासिक निर्णय दिला असून तीन अपत्ये असणार्‍या उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील डोणगांव येथील सरपंच संजय भोस
तीन अपत्यानंतरही सरपंचपद वैध उच्च न्यायालयाचा एैतिहासिक निकाल


सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहात असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने एैतिहासिक निर्णय दिला असून तीन अपत्ये असणार्‍या उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील डोणगांव येथील सरपंच संजय भोसले यांना तीन अपत्ये असल्याच्या कारणावरून पुणे विभागीय अप्पर आयुक्तांनी रद्द केलेले सरपंचपद वैध असल्याचा निकाल कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमुर्ती चपळगांवकर यांनी दिला. भारत सरकारच्या लघु कुटुंब कायदा 2005 नुसार कोणत्याही भारतीय नागरीकाला तीन अपत्ये असल्यास कोणताच शासकीय लाभ किंवा निवडणुकीला उभे राहता येत नाही असा कायदा आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे संजय भोसले हे डोणगांवचे सरपंच म्हणून कार्यरत असताना विरोधकांनी त्यांच्या विरूध्द तीन अपत्ये असल्याची तक्रार करून सोलापूर जिल्हाधिकारी तसेच पुणे विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती त्यावर निकाल देताना अप्पर आयुक्तांनी संजय भोसले यांचे सरपंचपद रद्द ठरवले त्यावरून संजय भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी संजय भोसले यांच्या वकीलांनी संजय भोसले यांनी उमेदवारी दाखल करताना त्यांना दोनच अपत्ये हयातीत असल्याचा युक्तीवाद करून पुरावे न्यायालयासमोर सादर केले ते ग्राह्य धरून न्यायालयाने संजय भोसले यांचे सरपंचपद वैध ठरवून एैतिहासिक निर्णय दिला. या खटल्यात संजय भोसले यांच्या वतीने अ‍ॅड विनीत नाईक,अ‍ॅड आय एम खैरदी, अ‍ॅड नितीन हबीब तर विरोधकांच्या वतीने अ‍ॅउ अभिजित कुलकर्णी यांनी काम पाहिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande