
सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल आता समोर येत आहेत. २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, काही ठिकाणी मतमोजणीवेळी गोंधळ झाल्याचंही दिसून आलंय. सोलापुरातील दुधणी इथं चक्क स्ट्राँग रूमची चावीच हरवल्याचा प्रकार समोर आला. अधिकाऱ्यांकडे चावी नसल्यानं शेवटी स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलं आणि त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.मतमोजणी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरू झालीय. आता सुरुवातीचा कलही हाती आले आहेत. महाविकास आघाडी 157 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी पिछाडीवर दिसत आहे. सोलापुरातील दुधणी इथं स्ट्राँग रुमच्या कुलुपाची चावी सापडत नसल्यानं मतमोजणीला उशीर होत असल्याचं लक्षात येताच अधिकाऱ्यांनी कुलूप तोडण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराची चर्चा आता सर्वत्र होत आहे.दुधणीत मतमोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांनी शेवटी दुधणी स्ट्राँग रूमचं लॉक तोडलं. अधिकाऱ्यांना कुलुपाची चावी कुणाकडे आहे हेच माहिती नव्हतं. त्यांना चावी सापडत नव्हती. यामुळे मतमोजणी थांबली होती त्यामुळे शेवटी लॉक तोडण्याचा निर्णय घेतला. निवडणूक अधिकाऱ्यांनी चावी सापडत नसल्याचं उत्तर दिलं होतं. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली होती पण अधिकारी लॉकची चावी शोधत होते.मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढणे, बाईक रॅली काढणे, डॉल्बी लावण यावर पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी मोठी उपाययोजना करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड