
नाशिक, 21 डिसेंबर, (हिं.स.)। नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून महायुती करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून सातत्याने महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहे परंतु शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाढत्या मागणीमुळे ही बैठक किती यशस्वी होईल यावर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून रविवारी रात्री उशिराई झालेल्या बैठकीमध्ये कोणता तोडगा निघू शकलेला नाही. दुसरीकडे मात्र महायुतीकडून महायुतीचा दावा केला जात आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव ठाकरे, राकपाकाँग्रेस शरद पवार गट आणि अखिल भारतीय काँग्रेस या पाच राष्ट्रीय पक्ष एकत्र येऊन महा विकास आघाडी केली आहे. त्या दृष्टिकोनातून आता पावले टाकले जात आहे जिल्ह्यामध्ये भाजपला नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्याच मित्र पक्षांनी रोखल्यामुळे विरोधी असलेल्या महाविकास आघाडीचे मनोबल वाढले आहे याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठोस दावा जरी केला नसला तरी फरक पडेल आणि विकास आघाडीचा विजय होईल असे वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे शनिवारी रात्री उशिरापर्यंत महानगरपालिका निवडणुकीचे सत्ता केंद्र बनुपहात असलेल्या हॉटेल रेडिसन ब्ल्यू या ठिकाणी भाजपाचे नेते गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांची बैठक झाली या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 40 आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने 50 जागांची मागणी करण्यात आलेली आहे ज्या जागांची मागणी जास्त आहे त्यावर भाजपाचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे त्यामुळे एकूणच जास्त जागांची मागणी आणि भाजपला 100 प्लसचा नारा यामुळे भाजपा मित्र पक्षांना किती बरोबर घेणार हे आता बघावे लागणार आहे नाहीतर नगरपालिका निवडणुकी सारखी परिस्थिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याबाबत रविवारी पुन्हा बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे यावर दोन दिवसात तोडगा निघेल असे महायुतीच्या वतीने सांगण्यात येत असले आणि महायुतीच होणारा असा दावा जरी केला जात असला तरी महायुती समोर असलेल्या अडचणी थांबविणे मात्र अवघड आहे त्यावर आता विचार मंथन सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV