बीड : मन्यारवाडी येथे २२-२३ डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन
बीड, 21 डिसेंबर (हिं.स.)। गुरुकुल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मन्यारवाडी रोड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २२ आणि २३ डिसेंबर या दोन दिवस चालणार आहे. गटशिक्षण अधिकारी कार्यालय, पंचायत समिती गेवराई या
बीड : मन्यारवाडी येथे २२-२३ डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन


बीड, 21 डिसेंबर (हिं.स.)।

गुरुकुल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मन्यारवाडी रोड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २२ आणि २३ डिसेंबर या दोन दिवस चालणार आहे. गटशिक्षण अधिकारी कार्यालय, पंचायत समिती गेवराई यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनासाठी एनसीईआरटी, नवी दिल्लीच्या मार्गदर्शनानुसार 'विकसित आणि आत्मनिर्भर भारत' हा मुख्य विषय ठेवण्यात आला आहे. या मुख्य विषयाअंतर्गत सात उपविषयआहेत. शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, गणितीय रचना, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन हे विषय आहेत तालुक्यातील सर्व शाळांनी दोन गटांमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. प्राथमिक गटात १ ली ते ८ वी आणि माध्यमिक गटात ९ वी १२ ते वीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार संदीप खोमणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विठ्ठल राठोड असतील. गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. मोहन ठाकर,

प्राचार्य अरुणा ठाकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रविणकुमार काळम, भीमराव नांदुरकर, केंद्रप्रमुख संजय मोरे, केंद्रप्रमुख शेमे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधन व प्रयोगशीलतेला वाव दिला जाणार आहे. या प्रदर्शनात जास्तीत शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande