रोटरी क्लबतर्फे अहमदपुरात गरजूंना ब्लँकेट व चादर वाटप
लातूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। स्वतःचा वाढदिवस केवळ कौटुंबिक आनंदात साजरा न करता, थंडीने गारठलेल्या हातांना मदतीची ऊब देऊन साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम अहमदपूरचे सराफा व्यापारी व रोटरीचे पर्यावरण डायरेक्टर रो. संतोष मद्देवाड यांनी राबविला. रोटरी क्लब
वाढदिवसाचा 'उबदार' आनंद: रोटरी क्लबतर्फे अहमदपुरात गरजूंना ब्लँकेट व चादर वाटप पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर (गोविंद काळे): स्वतःचा वाढदिवस केवळ कौटुंबिक आनंदात साजरा न करता, थंडीने गारठलेल्या हातांना मदतीची ऊब देऊन साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम अहमदपूरचे सराफा व्यापारी व रोटरीचे पर्यावरण डायरेक्टर रो. संतोष मद्देवाड यांनी राबविला. रोटरी क्लब ऑफ अहमदपूरच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त फुटपाथवर व उघड्यावर राहणाऱ्या गरजूंना ब्लँकेट आणि उबदार चादरींचे वाटप करण्यात आले. ​रोटरी क्लब ऑफ अहमदपूरच्या परंपरेनुसार, प्रत्येक सभासदाचा वाढदिवस हा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. सध्या अहमदपूर शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. अशा परिस्थितीत शहरातील बस स्थानक परिसर, थोडगा रोडवरील निजवंते मैदान आणि इतर भागात झोपड्या करून राहणाऱ्या गरीब कुटुंबांना, विशेषतः महिला, वृद्ध आणि बालकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आर्थिक परिस्थितीअभावी गरम कपडे खरेदी करू न शकणाऱ्या या लोकांसाठी रोटरी क्लब मदतीला धावून आला. ​शनिवारी रात्री उशिरापर्यंत या परिसरात शोध घेऊन उघड्यावर झोपणाऱ्या गरजूंना उबदार चादरींचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी अध्यक्ष कपिल बिरादार यांनी संतोष मद्देवाड यांच्या कार्याचे कौतुक केले. ​या सामाजिक उपक्रमावेळी रोटरीचे पदाधिकारी मनोज आरदवाड, गणेश बेंबळकर, भरत ईगे, श्रीराम कलमे, दिलीप आरदवाड आणि रामचंद्र गंगथडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसात उघड्यावर राहणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांमधून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.


लातूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। स्वतःचा वाढदिवस केवळ कौटुंबिक आनंदात साजरा न करता, थंडीने गारठलेल्या हातांना मदतीची ऊब देऊन साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम अहमदपूरचे सराफा व्यापारी व रोटरीचे पर्यावरण डायरेक्टर रो. संतोष मद्देवाड यांनी राबविला. रोटरी क्लब ऑफ अहमदपूरच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त फुटपाथवर व उघड्यावर राहणाऱ्या गरजूंना ब्लँकेट आणि उबदार चादरींचे वाटप करण्यात आले.

​रोटरी क्लब ऑफ अहमदपूरच्या परंपरेनुसार, प्रत्येक सभासदाचा वाढदिवस हा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. सध्या अहमदपूर शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. अशा परिस्थितीत शहरातील बस स्थानक परिसर, थोडगा रोडवरील निजवंते मैदान आणि इतर भागात झोपड्या करून राहणाऱ्या गरीब कुटुंबांना, विशेषतः महिला, वृद्ध आणि बालकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आर्थिक परिस्थितीअभावी गरम कपडे खरेदी करू न शकणाऱ्या या लोकांसाठी रोटरी क्लब मदतीला धावून आला.

​शनिवारी रात्री उशिरापर्यंत या परिसरात शोध घेऊन उघड्यावर झोपणाऱ्या गरजूंना उबदार चादरींचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी अध्यक्ष कपिल बिरादार यांनी संतोष मद्देवाड यांच्या कार्याचे कौतुक केले.​या सामाजिक उपक्रमावेळी रोटरीचे पदाधिकारी मनोज आरदवाड, गणेश बेंबळकर, भरत ईगे, श्रीराम कलमे, दिलीप आरदवाड आणि रामचंद्र गंगथडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसात उघड्यावर राहणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांमधून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande