
सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)।महापालिकेच्या रणधुमाळीत सोलापुरात सत्ताधारी भाजपची गाडी जोरदार पळत असून इतर राजकीय पक्षांना धक्के बसत आहेत. त्यातल्या त्यात काँग्रेसच्या मागे भाजप हात धुवून लागली आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस पक्षात आलेल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट न दिल्याने अतिशय नाराज झालेल्या माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच माने समर्थक विनोद भोसले यांनी भाजपात प्रवेश केला.भोसले सोबतच माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे हे सुद्धा वातावरण पाहून भाजपात दाखल झाले. प्रभाग नऊ मध्ये ते इच्छुक आहेत
प्रवीण डोंगरे हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार अशी शक्यता होती. नागपूरमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डोंगरे यांनी लक्ष वेधले होते. महापालिका पाणी पुरवठा यंत्रणेचा त्यांचा चांगला अभ्यास दिसला. त्यामुळे राष्ट्रवादी वाल्यांनी त्यांना प्रकाशात आणले. त्यावेळी असे वाटले की ते दादांच्या राष्ट्रवादीत जातील पण डोंगरेंनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला मामा बनवल्याचे दिसून येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड