
अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.)।
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि दर्यापूर नगरपरिषदांवर काँग्रेसने सत्ता मिळवत मोठे यश संपादन केले आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खासदार बळवंत वानखडे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विजयाच्या आनंदात वानखडे यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करत डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दर्यापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या उमेदवाराने विद्यमान आमदारांच्या पत्नीचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. तर चिखलदरा येथे भाजपाने प्रतिष्ठेची निवडणूक मानून जोरदार प्रचार केला असतानाही काँग्रेसने सत्ता आपल्या हातात घेत भाजपाला धक्का दिला आहे.या निकालांमुळे अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचे बळ वाढले असून आगामी राजकारणाच्या दृष्टीने या विजयाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी