रत्नागिरीत मंगळवारी उद्योजकता मेळावा
रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मंगळवारी, दि. २३ डिसेंबर रोजी उद्योजकता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सूक्ष्म, लघउद्योजक व पारंपरिक कारागीर यांचे ''दे आसरा फाऊंडेशन संस्था व जिल्ह
रत्नागिरीत मंगळवारी उद्योजकता मेळावा


रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मंगळवारी, दि. २३ डिसेंबर रोजी उद्योजकता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सूक्ष्म, लघउद्योजक व पारंपरिक कारागीर यांचे 'दे आसरा फाऊंडेशन संस्था व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र' यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी सोबत दिलेल्या लिंकवर आपली माहिती भरून उद्योजक मार्गदर्शन मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.

आपली माहिती भरण्यासाठीची लिंक अशी -

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc9qAVCdvTxFMGYTZTW&Bk9Z9rkCsUHR_ELDjB&vyPr4 2ewnA/viewform

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande