कैलासनगर–अजबनगरमधील माजी नगरसेविका आशा भालेराव यांचा भाजप प्रवेश
छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील कैलासनगर व अजबनगर भागातील माजी नगरसेविका आशा भालेराव, नरेश भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना भाजपचे आमदार संजय केणेकर
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील कैलासनगर व अजबनगर भागातील माजी नगरसेविका आशा भालेराव, नरेश भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना भाजपचे आमदार संजय केणेकर म्हणाले की, राष्ट्रप्रथम, संस्कृतीप्रधान आणि विकासाभिमुख विचारधारेवर विश्वास ठेवून भाजपात सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा ठाम विश्वास आहे.

यावेळी अतुल सावे (इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री), माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार भात कराड, मा. महापौर बापु घडामोडे, निवडणूक प्रमुख समीर राजुरकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, भाजपा प्रदेश सचिव किरण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande