तरुणाई सज्ज! ११ जानेवारीला रायगडावर गडरोहण स्पर्धा
रायगड, 22 डिसेंबर (हिं.स.)। स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगड येथे भव्य गडरोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी होणार असून इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्
जानेवारीला रायगडावर गडरोहण स्पर्धा


रायगड, 22 डिसेंबर (हिं.स.)। स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगड येथे भव्य गडरोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी होणार असून इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित यांनी केले आहे.

ही स्पर्धा पुरुष व महिला अशा स्वतंत्र गटांत विविध वयोगटांमध्ये होणार आहे. प्रत्येक गटासाठी प्रथम पाच क्रमांकांना रोख बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम बक्षिस रु. ५ हजार, द्वितीय रु. ४ हजार, तृतीय रु. ३ हजार, चतुर्थ रु. २ हजार व पाचवे बक्षिस रु. १ हजार असेल. तसेच प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेचा मार्ग चित्त दरवाजा – महादरवाजा – होळीचा माळ असा निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धेची सुरुवात रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता होईल. प्रवेश शुल्क रु. ४० इतके ठेवण्यात आले आहे. स्पर्धकांची नोंदणी शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पाचाड धर्मशाळा येथे करण्यात येणार आहे.

स्पर्धकांसाठी शनिवार, दि. १० जानेवारी रोजी विनामूल्य भोजन व्यवस्था तर रविवार, दि. ११ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. ११ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता किल्ले रायगड येथे होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे वितरण श्री शिवपुण्यतिथी दिनी, गुरुवार दि. तरुणाई सज्ज! ११ जानेवारीला रायगडावर गडरोहण स्पर्धा

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande