न.प. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस छ. संभाजीनगर जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकावर
छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)। नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या ७४ पैकी ३८ जागांवर विजय मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या यादीत राष्ट्रवादी
Q


छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)। नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या ७४ पैकी ३८ जागांवर विजय मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार सतीशभाऊ चव्हाण यांनी आपले नेतृत्व सिध्द केले आहे.

२ डिसेंबर रोजी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गंगापूर, खुलताबाद व कन्नड नगराध्यक्षपदासाठी आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये गंगापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जाधव २२५२ मतांनी विजयी झाले. जिल्ह्यातील एकूण १६० नगरसेवक जागांपैकी राष्ट्रवादीने ७४ उमेदवार उभे केले होते.

यामध्ये गंगापूर नगर परिषदेत २० पैकी ११, खुलताबादमध्ये २० पैकी ९, कन्नडमध्ये २० पैकी १२, वैजापूरमध्ये ९ पैकी ४, पैठणमध्ये २ पैकी २ अशा एकूण ३८ जागांवर विजय मिळवत दुसर्‍या क्रमांकावर बाजी मारली आहे. कन्नड व खुलताबाद नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आले नसले तरी कन्नडमध्ये सर्वाधिक १२ नगरसेवक तर खुलताबादमध्ये सर्वाधिक ९ नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच विजयी झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रथम क्रमांकावर आहे.

जिल्ह्यातील एकूण १६० नगरसेवकांपैकी शिंदेसेनेचे ५५, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ३८, भाजपचे ३७, काँग्रेसचे १८, उबाठाचे ९, तुतारीचा १ तर अपक्ष २ नगरसेवक निवडून आले आहेत. आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दमदार वाटचाल करेल...असा विश्वास जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande