
छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)।प्रभाग क्रमांक २४, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस आ.अनुराधाताई अतुल चव्हाण, आ.नारायण कुचे तसेच मा महापौर बापू घडामोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत प्रभागातील विकासकामे, संघटनात्मक आढावा, नागरिकांच्या समस्या तसेच आगामी राजकीय व सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संघटन अधिक मजबूत करण्यावर मंत्री अतुल सावे यांनी भर दिला. प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis