छ. संभाजीनगर मनपा निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांचा भूमिपूजन–उद्घाटनांचा धडाका
छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका सुरू केला आहे. तिरुपती गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, तिरुपती नगर सिडक
अ


छत्रपती संभाजीनगर, 22 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका सुरू केला आहे.

तिरुपती गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, तिरुपती नगर सिडको महानगर-१, छत्रपती संभाजीनगर येथे तिरुपती नगर येथे

विठ्ठल–रुख्मिणी मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिर व हनुमान मंदिरयांचा मंदिर भूमिपूजन सोहळा अतिशय भक्तिमय व वातावरणात पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते पार पडला.

या पवित्र प्रसंगी स्थानिक नागरिक, भाविक व रहिवाशांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. मंत्रोच्चार, पूजा-अर्चा आणि भक्तीमय वातावरणामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. तिरुपती नगर परिसरात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक एकोपा अधिक दृढ होण्यासाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरला. तिरुपती गृहनिर्माण हौसिंग सोसायटी यांच्या वतीने आयोजित या भूमिपूजन सोहळ्याने परिसरातील धार्मिक परंपरेला नवा आयाम दिला.

------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande