पराभूत उमेदवारांनीही खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा कामाला लागावे - पंकजा मुंडे
बीड, 22 डिसेंबर (हिं.स.)। बीड नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे १५ नगरसेवक तसेच गेवराईच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष गीताभाभी बाळराजे पवार यांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते भा
बीड


बीड, 22 डिसेंबर (हिं.स.)।

बीड नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे १५ नगरसेवक तसेच गेवराईच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष गीताभाभी बाळराजे पवार यांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते भाजपच्या जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी पंकजाताई मुंडे यांच्यासह बीड शहरातून १५ तर संपूर्ण जिल्ह्यातून ६० पेक्षा अधिक नगरसेवक भाजपच्या वतीने विजयी झाल्याचे सांगत सर्वांचे अभिनंदन केले. पराभूत उमेदवारांनीही खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा कामाला लागावे, असा सकारात्मक संदेश दिला.

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, ॲड. सर्जेराव तांदळे, डॉ.सारिका क्षीरसागर, नवनाथ शिराळे, भाजप नेते माधव निर्मळ, गेवराईच्या नगराध्यक्षा गीताबाळराजे पवार, बीड नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. ज्योती घुंबरे तसेच भाजपचे जिल्हा व शहर कार्यकारणीतील पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande