
परभणी, 23 डिसेंबर (हिं.स.)।
मानवी समाजाची प्रगती करायची असेल तर चांगल्या मुल्यांची आणि विचारांची गरज असते आणि मानवी समाज सक्षम बनवायचा असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज असते, असे प्रतिपादन प्रा. डॉ . संतोष रणखांब यांनी केले, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक रामदास भिसे, प्रमुख पाहुणे शरद मुंडे प्रा. डॉ. शिवाजी अंभूरे हे होते.
तालुक्यातील वाणी संगम येथे वैज्ञानिक दृष्टिकोन काळाची गरजया विषयावर बही:शाल शिक्षण केंद्र व्याख्याते डॉ.संतोष रणखांब यांचे व्याख्यान आयोजित केले होते, त्या प्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन जि. प. प्रशालेच्या वतीने करण्यात आले होते,या वेळी शरद मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक रामदास भिसे यांनी अध्यक्षीय समारोपात वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा असून वैज्ञानिक दृष्टिकोनामधून समाज प्रगल्भ बनतो, विकसित समाजाचे एक लक्षण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झालेला समाज असेच आहे, असे म्हटले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बही:शाल शिक्षण केंद्र समिती प्रमुख डॉ. शिवाजी अंभूरे यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण कुमार पवार यांनी केले. आभार हर्षवर्धन वाघमारे यांनी मानले, कार्यक्रमासाठी प्रा. अजय जाधव, प्रा. भैय्या जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis