नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी निवडणूक अर्जांची विक्रमी विक्री
नाशिक, 23 डिसेंबर (हिं.स.)। : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल १७६३ उमेदवारी अर्जांची विक्रमी विक्री झाली. विविध पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज खरेदी करत निवडणूक रि
नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी निवडणूक अर्जांची विक्रमी विक्री


नाशिक, 23 डिसेंबर (हिं.स.)। : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल १७६३ उमेदवारी अर्जांची विक्रमी विक्री झाली. विविध पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज खरेदी करत निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. महापालिकेतील सत्तासमीकरणे, प्रभाग रचना, आरक्षण आणि महायुती–महाविकास आघाडीतील अनिश्चितता, मनसे-उद्धवसेनेची युती यामुळे इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. भाजप, शिंदेगट, राष्ट्रवादी (अजित पवार), उद्धवसेना, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस यांसह इच्छुकांनी अर्ज खरेदीसाठी गर्दी केली होती. इच्छुक उमेदवारांनी सर्टिफाईड मतदार याद्या खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

सिडको : ५४४

नाशिक पूर्व : ४१५

नाशिकरोड : २६६

पंचवटी : २४०

सातपूर : १६१

नाशिक पश्चिम : १२७

एकूण : १७६३

जुने नाशिकमधील वॉर्डातुन प्रभाग १४ मधून सर्वाधिक १४२ अर्जांची विक्री झाली असून त्या खालोखाल प्रभाग २९ मधून १४१ अर्जांची विक्री झाली आहे. सर्वात कमी अर्ज विक्री प्रभाग ५ मधून केवळ १३ मधून झाली आहे.

पोलीस बंदोबस्त तैनात

गोंधळाची शक्यता लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयांभोवती कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर बैरिकेटिंग करण्यात आले आहे. महापालिकेकडून प्रत्येकी ५० रुपये शुल्क आकारून उमेदवारी नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात येत असून एका प्रभागासाठी एका उमेदवाराला चार अर्ज घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

----

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande