
अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले ही घटना भारतीय स्त्रीमुक्तीची सोनेरी पहाट होती, या दिनाचे औचीत्य साधुन गेल्या २८ वर्षा पासुन २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणुन जाहीर व्हावा अशी एकमुखी मागणी वंचीत बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हयाच्या वतीने करण्यात येत आहे. सन २०१५ पासुन शासनाने २५ डिसेंबर हा सुशासन दिवस म्हणुन साजरा करण्याचे फर्मान काढले म्हणजे मनुस्मृतीला समर्थन देणे व स्त्रियांचा अपमान करने हेच शासनाचे धोरण आहे या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि २५ डिसेबर हा दिवस भारतिय स्त्री मुक्ती दिन म्हणुन जाहिर करण्याच्या मागणीसाठी गुरवार दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी वेळ दुपारी ११:०० वाजता स्थानिक प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महिला प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट ह्या राहणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर महिला अध्यक्ष वंदनाताई वासनिक तर स्वागताध्यक्षपदी महिला जिल्हाध्यक्षा आम्रपालीताई खंडारे ह्या राहतील. परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून इंदुताई मेश्राम
जि.अ.भा. बौ. महासभा, संगिताताई अढाऊ माजी जि.प. अध्यक्ष जिल्हा महासचिव वंचित बहुजन महिला आघाडी तर पुष्पाताई इंगळे मा.जि.प. सदस्य, प्रभाताई सिरसाट मा. जिल्हा अध्यक्ष, यासहआदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरि या विराट भारतीय स्त्री मुक्ती परिषदेला अकोला जिल्हयातील तमाम महिलांनी हजारोच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत महानगर महिला अध्यक्ष वंदनाताई वासनिक व महिला जिल्हाध्यक्षा आम्रपालीताई खंडारे ह्यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला अनुराधा ठाकरे, सुवर्णा जाधव, सरलाताई मेश्राम, किरण बोराखडे, सरोज वाकोडे, मायाताई इंगळे, मंदाताई शिरसाट, वैशाली सदांशिव, रुपाली गवई, सुनिता गजघाटे, पार्वतीलाई लहाने, प्रतिभा नागदेवते, तेजस्विनी बागडे, योगिता वंजारी या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे