
अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)। क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला द्वारा राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन जसनागरा पब्लिक स्कूल रिधोरा येथे दिनांक 23 ते 25 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती वर्षा मीना (भा प्र से) जिल्हाधिकारी अकोला यांनी केले.
स्पर्धेचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीशचंद्र भट यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जसनागरा पब्लिक स्कूलचे संचालक श्री सिमरनजीत सिंग नागरा, महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री इंद्रजीत नितनवार, अकोला जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव श्री नारायण बत्तुले, निवड समिती सदस्य रा क्रिमा रेवन्ना शेलार, प्रा संतोष खेंडे उपस्थित होते. यावेळी उद्घाटन पर मा जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात करिअर कसे घडवायचे याबद्दल मार्गदर्शन केले व जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळ खेळणे कसे आवश्यक असते याबद्दल मार्गदर्शन केले.
आज सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यांचे विवरण खालील प्रमाणे - पहिला सामना मुलांच्या गटात पुणे विभाग विरुद्ध लातूर विभाग या दरम्यान झाला यामध्ये पुणे 9-0 ने विजयी झाला. दुसरा सामना नागपूर विभाग विरुद्ध अमरावती विभाग यांच्यात झाला यामध्ये अमरावती 7-10 ने विजयी झाला. तिसरा सामना मुंबई विभाग विरुद्ध कोल्हापूर विभाग यांच्यात झाला यामध्ये कोल्हापूर विभाग 0-1 ने विजयी झाला. चौथा सामना नाशिक विभाग विरुद्ध छत्रपती संभाजी नगर विभाग या दरम्यान झाला यामध्ये नाशिक विभाग विजयी झाला.
त्याचप्रमाणे मुलींच्या वयोगटात झालेले सामने खालील प्रमाणे -
1. पुणे विभाग विरुद्ध छत्रपती संभाजी नगर यामध्ये पुणे विभाग 4-1 ने विजयी
2. नागपूर विभाग विरुद्ध अमरावती विभाग यामध्ये नागपूर विभाग 4-1 ने विजयी
3. कोल्हापूर विभाग विरुद्ध नाशिक विभाग यामध्ये नाशिक विभाग 2-8 ने विजयी
4. लातूर विभाग विरुद्ध मुंबई विभाग यामध्ये मुंबई विभाग 2-8 ने विजयी
यामध्ये पंच म्हणून आकाश साबणे (परभणी), विक्की सारिसे (अमरावती), अकलिम शहा (अमरावती), तोफिक शहा (अमरावती), अभिजीत स्वर्गे (अमरावती), आरती भगत (कोल्हापूर), सायमा बाजवान (परभणी), रजत हिरोडे (अकोला), जहागीर शेख (लातूर) यांनी केले. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या निवासाची व क्रीडांगणाची व्यवस्था जसनागरा पब्लिक स्कूल मध्ये करण्यात आली. स्पर्धेचे नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा मार्गदर्शक श्रीमती डॉ नलिनी जाधव, डॉ अभिजीत फिरके, राजेश गावंडे (जिल्हा संघटक) श्रीमती मनीषा ठाकरे क्री. अ. निशांत वानखडे, गजानन चारसे परिश्रम घेत आहेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ सतीशचंद्र भट यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे