तेल्हारा नगरपरिषद निकालावर उबाठा उमेदवार शिवानी थाटेंचा आक्षेप , पोलिसात तक्रार..
अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपरिषदेच्या निकालाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून उबाठा गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी थाटे यांनी याप्रकरणी तेल्हारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २१ डिसे
H


P


अकोला, 23 डिसेंबर (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपरिषदेच्या निकालाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून उबाठा गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी थाटे यांनी याप्रकरणी तेल्हारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २१ डिसेंबर रोजी निकालाच्या दिवशी सकाळी १०.३५ वाजता, भाजपचे चिन्ह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो असलेल्या एका व्हॉट्सॲप नंबरवरून शिवानी थाटे यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. या संदेशात “तुम्ही ९४१ मतांनी पराभूत होणार” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.विशेष बाब म्हणजे हा संदेश आलेला मोबाईल नंबर महाराष्ट्राबाहेरील असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर येत आहे. प्रत्यक्ष निकालात भाजपच्या वैशाली पालीवाल या १२४२ मतांनी विजयी झाल्या, तर संदेशात निकालाआधीच ९४१ मतांनी पराभवाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाली असावी, असा गंभीर संशय शिवानी थाटे यांनी व्यक्त केला असून त्याला पोलिसात त्यांनी या संदर्भात तक्रार नोंदविली आहे.

निकाल जाहीर होण्यापूर्वीच उमेदवाराच्या मोबाईलवर निकालासदृश संदेश येणे ही बाब अत्यंत संशयास्पद असून त्यामुळेच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अशाच स्वरूपाचे संदेश नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या इतर उमेदवारांनाही प्राप्त झाले असल्याचेही समोर येत आहे.या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी उबाठा गटाकडून करण्यात येत आहे.तर पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.मात्र या संदर्भात पोलिसांनीही हा मेसेज कोणी पाठवला व त्याच्याकडे हे आकडे कशी आले याचा तपास केला पाहिजे आणि पोलिसांनी जर या प्रकरणात तपास नाही केला तर आम्ही कोर्टामार्फत तपास करायला लावू असा इशारा या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. या प्रकारामुळे तेल्हारा नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आता या प्रकरणाची दखल वंचित बहुजन आघाडीने सुद्धा घेतली आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande