
बीड, 23 डिसेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील काळवीट तलावात पट्टीचे पोहणारे सेवानिवृत्त कर्मचारी विश्वनाथ बुरांडे (६४) हे पोहताना अचानक बेपत्ता झाले होते. तीन दिवसांपासून काळवीट तलावात शोध मोहीम सुरु होती. अखेर चौथ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. शोध पथकाने त्यांचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला.
सेवानिवृत्त कर्मचारी विश्वनाथ बुरांडे हे काळवीट तलावाजवळ बेपत्ता झाले होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तलावाच्या किनारी कपडे बुट निदर्शनात आले होते. दिवसभर घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहुन शोध कार्य युद्धपातळीवर सुरू ठेवले होते. स्थानिक प्रशासनाने शोध घेऊनही यश आले नसल्यामुळे बीड, परळी येथून विशेष शोध पथक पाचारण करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis