
लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। विकासाच्या राजकारणाला भक्कम पाठिंबा देत मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात विविध पक्षातून नेते कार्यकर्ते पदाधिकारी पक्षप्रवेश करीत असल्याची माहिती भाजपचे महानगराध्यक्ष अजित कव्हेकर यांनी दिली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख व जनकल्याणकारी धोरणांवर विश्वास व्यक्त करत लातूर शहरातील मोठ्या संख्येने युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष अजित कव्हेकर यांनी दिली आहे
या मध्ये सागर दरेकर ,विशाल पोठे ,अभिजित गुंडरे,,तेजस बरूरे,काकासाहेब सोमवंशी ,निलेश आवसकर,शंभू शेळके,रितेश जाधव,पांडुरंग कासले,शरद कदम,शैलेश भालेकर,कृष्ण साळुंके,सूरज चव्हाण ,अक्षय पाटील ,मुकेश येणगे यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला.
गेल्या काही वर्षांत भाजपा सरकारच्या माध्यमातून लातूर शहरात विविध विकासकामे वेगाने मार्गी लागत असून या कार्याला दिवसेंदिवस नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन शहरात अधिक मजबूत झाले असून आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये या संघटनशक्तीचे सकारात्मक परिणाम निश्चितपणे दिसून येतील. असे ही त्यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis