
चंद्रपूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।प्रशासनिक सुधार आणि लोक तक्रार विभाग कार्मिक, लोक तक्रार आणि पेंशन मंत्रालय भारत सरकारद्वारे गुडगर्व्हनस विक -2025 अंतर्गत ‘प्रशासन गाव की और’ मोहीम 19 ते 25 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने सदर मोहिमेंतर्गत विविध कार्यक्रम व शिबीर सर्व तालुका स्तरावर तहसील मुख्यालय / पंचायत समित्या इत्यादी ठिकाणी राबविण्यात येणार आहे. सुशासनाला चालना देणे, तसेच सार्वजनिक तक्रारीचे निवारण आणि सार्वजनिक सुधारणा व सेवा वितरण हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
सदर कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे : 1. विशेष शिबिर आयोजीत करून शिबिरामध्ये सोडवलेल्या सार्वजनिक तक्रारींची संख्या, 2. CPGRAMS मध्ये सोडवलेल्या सार्वजनिक तक्रारीची संख्या, 3. राज्य पोर्टलवर सोडवलेल्या सार्वजनिक तक्रारीची संख्या, 4. ऑनलाईन सेवा वितरणासाठी जोडलेल्या सेवांची संख्या, 5. निकाली काढलेल्या सेवा वितरण अर्जाची संख्या, 6. सुशासन पद्धतीचे संकलन आणि प्रसार आणि पोर्टलवर आवश्यक चित्रासह ते सामायिक करणे, 7. सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी यशोगाथा, 8. प्रसार कार्यशाळेचे तपशील.
तरी सर्व नागरिकांनी सदर गुड गर्व्हनस विक 2025 अंतर्गत ‘प्रशासन गाव की और’ मोहिमेत शिबिराचा लाभ घ्यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी डी. एस. कुंभार यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव