
चंद्रपूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन भवन येथे अल्पसंख्याक हक्क दिनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त कुमरे यांनी अल्पसंख्यांक समुदायांकरीता शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. अनिसा तडवी यांनी रोजगार व स्वयंरोजगारांबाबत अल्पसंख्यांक समुदायांकरीता असलेल्या योजनांबाबत माहिती सांगितली.
तसेच शिक्षणाधिकारी राजेश पाताळे यांनी सुध्दा शिक्षणविषयक असलेल्या सर्व योजनांची माहिती, प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांनी अल्पसंख्यांक असलेल्या मुलींना उच्च शिक्षण घेण्याकरीता वसतीगृहात असलेल्या नि:शुल्क सोयी व सुविधांची माहिती सांगितली. यावेळी जिल्हा व्यवास्थापक ओवेस अंसारी यांनी अल्पसंख्यांक समुदायांकरीता असलेल्या बॅंकेतील कर्ज योजना व इतर योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव