चंद्रपूर - एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल देवाडा करिता प्रवेश अर्ज सुरू
चंद्रपूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत येत्या 1 मार्च 2026 र
चंद्रपूर - एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल देवाडा करिता प्रवेश अर्ज सुरू


चंद्रपूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।

राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत येत्या 1 मार्च 2026 रोजी प्रवेश पूर्व परिक्षा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, देवाडा, ता.राजुरा, येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षाद्वारे इयत्ता 6 वी करिता 2220 नविन विद्यार्थ्यांची प्रवेश भर्ती तसेच इयत्ता 7 वी ते 9 करिता रिक्त असलेल्या जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे.

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, देवाडा मध्ये इयता 6 वी करिता 30 मुले व 30 मुली अशी 60 प्रवेश क्षमता राहणार आहे व इयत्ता 6 वी ते 9 वी ची भरती ही पुर्व परिक्षाद्वारे भरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणानुक्रमाने प्राधान्य क्रमानुसार होणार आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल मधील प्रवेशाकरिता अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर व प्रकल्पांतर्गत येत असलेल्या शासकीय / अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वसतीगृह, एकलव्य स्कुल मध्ये उपलब्ध आहेत.

अर्जाकरीता पात्रता : लाभार्थी अनुसुचित जमातीचा असावा तसेच वडीलांचे वार्षिक उत्पन्न 6 लक्ष रुपयांपेक्षा कमी असावे. अशा पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रकल्प कार्यालय, चंद्रपुर येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande