
चंद्रपूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। पणन हंगाम 2025-26 खरीप मधील शासकीय आधारभुत किमत खरेदी योजनेअंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करीता शेतकरी नोंदणीला या पुर्वी 15 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात शेतकरी नोंदणी झालेली असून, कोणताही शेतकरी नोंदणीपासून वंचित राहू नये याकरीता खरीप पणन हंगाम 2025-26 मधील धान व भरडधान्य उत्पादक शेतकरी नोंदणी करीता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.तरी धान/ भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जावून मुदतीत ऑनलाईन नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव