रत्नागिरी : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बुधवारी ग्राहक जनजागृती प्रदर्शन
रत्नागिरी, 23 डिसेंबर, (हिं. स.) : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने बुधवारी, दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजता रत्नागिरी शहर मुख्य बस स्थानक येथे विशेष ग्राहक जनजागृती प्
रत्नागिरी : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बुधवारी ग्राहक जनजागृती प्रदर्शन


रत्नागिरी, 23 डिसेंबर, (हिं. स.) : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने बुधवारी, दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजता रत्नागिरी शहर मुख्य बस स्थानक येथे विशेष ग्राहक जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनामध्ये ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये, तक्रार निवारण यंत्रणा तसेच या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये ग्राहकविषयक जागरूकता वाढविणे, फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच ग्राहकांनी आपले हक्क योग्य पद्धतीने बजावावेत, हा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनात माहिती फलक, मार्गदर्शन व तज्ज्ञांकडून सल्ला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपलब्ध माहिती व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त शशिकांत यादव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande