राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप असलेले 57 माजी नगरसेवक निर्दोष
कोल्हापूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।राष्ट्रगीत अवमान प्रकरणी आरोप असलेले 49 माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर गादिया यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली.. कोल्हापूर महानगरपालिकेमधील सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट
माजी नगरसेवक न्यायालयाच्या आवारात


कोल्हापूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।राष्ट्रगीत अवमान प्रकरणी आरोप असलेले 49 माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर गादिया यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली.. कोल्हापूर महानगरपालिकेमधील सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रगीत अवमान आरोप प्रकरणी तत्कालीन 56 नगरसेवक यांचे विरुद्ध मे. मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर यांच्या न्यायालयात फिर्यादी मेजर संजय शिंदे यांनी 20- 2 -2006 रोजीच्या फिर्याद दाखल केलेली होती. सदरची केस 19 वर्ष सुरू होती. सदर केस मधील फिर्यादी यांची केस शाबित न झाल्यामुळे तत्कालीन 57 नगरसेवकांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून राष्ट्रगीत अवमान आरोप प्रकरणी 57नगरसेवकांना मुख्य न्यायदंडाधिकारीसो कोल्हापूर गादिया साहेब यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली. आज दि 23-12-2025 रोजी केली सदर 57 नगरसेवक यांच्यातर्फे ॲडव्होकेट हर्षा खंडेलवाल, ॲडव्होकेट गजानन कोरे, ॲडव्होकेट के. पी. राणे, ॲडव्होकेट पी. डी. सामंत, व ॲडव्होकेट व्ही. व्ही. पाटील यांनी काम पाहिले यातील 57 पैकी 8 नगरसेवक मयत असून हयात 49 जणांची निर्दोष मुक्तता झाली. यावेळी न्यायालयात संजय पवार, उदय दुधाने, उदय जगताप, प्रकाश पाटील, राजू आवळे, सागर चव्हाण, राजू कसबेकर, रफिक मुल्ला, अशोक जाधव, तुकाराम तेरदाळकर, विजय साळोखे सरदार, सतीश घोरपडे, ईश्वर परमार, संभाजी देवणे, संजय चौगुले उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande