लातूर - जोगाळा ग्रामपंचायतीच्या वतीने डिजिटल प्रशासनाला चालना देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम
लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत जोगाळा ग्रामपंचायतीच्या वतीने डिजिटल प्रशासनाला चालना देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थांच्या सोयीसाठी क्यूआर कोडद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली
लातूर - जोगाळा ग्रामपंचायतीच्या वतीने डिजिटल प्रशासनाला चालना देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम


लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत जोगाळा ग्रामपंचायतीच्या वतीने डिजिटल प्रशासनाला चालना देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थांच्या सोयीसाठी क्यूआर कोडद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या उपक्रमातून १ लाख २५ हजार रुपयांची कर वसुली यशस्वीपणे करण्यात आली आहे.

परंपरागत पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने कर भरण्याची प्रक्रिया सुलभ, जलद व पारदर्शक झाली आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आदी कर नागरिकांनी मोबाईलवरून सहज भरल्यामुळे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वेळेची बचत होऊन कार्यालयीन कामकाजातही कार्यक्षमता वाढली आहे.

जोगाळा ग्रामपंचायतीने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. सरपंच सौ.निर्मला पंडित माने, उपसरपंच इंद्रजीत रंगराव माने, संगणक परिचालक बाळू मुळके, कर्मचारी शंकर धुमाळ यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी ठरला. जमा झालेल्या निधीचा उपयोग गावातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व विकासकामांसाठी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या उद्दीष्टांना अनुसरून डिजिटल ग्रामपंचायत घडविण्याच्या दिशेने जोगाळा ग्रामपंचायतीचा हा अभिनव उपक्रम खुप चांगला असून हा उपक्रम तालुक्यातील इतर सर्व ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे, असे गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande