लातूर - नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा
लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। लातूर ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने लातूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. लातूर जिल्ह्यातील 3 नगरपरिषद व 1 नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. अहमदप
जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा.


लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। लातूर ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने लातूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. लातूर जिल्ह्यातील 3 नगरपरिषद व 1 नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. अहमदपूर नगर परिषदचे नगराध्यक्ष ॲड स्वप्नील व्हत्ते, निलंगा नगर परिषदचे नगराध्यक्ष श्री संजयराज हलगरकर, उदगीर नगर परिषदच्या नगराध्यक्षा सौ. स्वातीताई हुडे व रेणापूर नगर पंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती शोभाताई आकनगिरे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री बसवराज पाटील, लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशप्पा कराड, माजी आमदार श्री त्र्यंबकनाना भिसे, माजी आमदार श्री बब्रुवान खंदारे, माजी जिल्हाध्यक्ष श्री दिलीपराव देशमुख, श्री गणेश हाके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राहुल केंद्रे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री रामचंद्र तिरूके, श्री बसवराज पाटील कौळखेडकर, ॲड भारत चामे, श्रीमती उत्तराताई कलबुर्गे, श्री. निळकंठ मिरकले, श्री पंडित सूर्यवंशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande